ह्या प्रसिद्ध अभिनेत्रीवर आली भीक मागण्याची वेळ…मंत्रालयात वर्षानुवर्षे चकरा मारूनही कोणी मदत केली नाही

चित्रपट सृष्टीत प्रसिद्धी मिळूनही अनेक कलाकारांना जगणंही मुश्किल झालेल्या अनेक बातम्या तुम्ही यापूर्वी कित्तेकदा पाहिल्या असतील. एका मराठी अभिनेत्री बाबतही असच घडतय. “धूमधडाका” चित्रपटातील “प्रियतम्मा प्रियतम्मा दे मला तू चुम्मा” या गाजलेल्या गाण्यातील अशोक सराफ यांच्या सोबत झळकलेली अभिनेत्री ” सुरेखा राणे” सध्या खूप हालाकीचे जीवन जगत आहेत. “भटक भवानी” या चित्रपटात हि त्यांनी लक्ष्मीकांत बेर्डे यांच्या सोबत काम केले होते. मराठीच नव्हे तर काही हिंदी चित्रपटांतही त्या दिसल्या. इतक्या सुंदर दिसणाऱ्या ह्या अभिनेत्रीवर आज अशी वेळ का आली हे जाणून तुम्हालाही धक्का बसेल..

धूमधडाका चित्रपटानंतर अभिनेत्री “सुरेखा राणे” हिने अमिताभ बच्चन ह्यांच्या “मर्द” या चित्रपटात काम केलं. मर्द चित्रपटात अमिताभ सोबत अमृता सिंग हि अभिनेत्री झळकली. मर्द मध्ये अमृता सिंगच्या डमीचे काम करताना घोडस्वारी करतानाच्या सीन मध्ये त्या घोड्यावर बसल्या असताना घोड्याने भीरकावलं आणि त्या जमिनीवर जोरदार आदळल्या. त्यांनी तो सीन कसाबसा पूर्ण केला. पण पुढच्या काही महिन्यात त्यांचा कंबरेचा त्रास खूप वाढला. पुढे हा त्रास इतका वाढला कि कंबरेखालचा भाग लुळा पडला. ह्यावर ईलाज करण्यासाठी त्यांनी दुबईत उपचार सुरु केले.
पण तेथील महाग ट्रीटमेंटमुळे त्यांच्या जवळचे सर्व पैसे संपून गेले. ह्यात त्यांनी स्वतःच घर आणि दाग दागिने विकले. त्यांनी अनेकदा सिनेजगतात अभिनेते आणि प्रोड्युसर यांच्याकडे मदतीचा हात मागितला, पण त्यांच्या मदतीसाठी कोणीही पुढे आले नाही.
यासर्व परिस्थितीमुळे त्यांच्या कुटुंबीयांनी देखील त्यांची साथ सोडून दिली. सरकारकडून त्यांना महिन्याला पेन्शन दिली जाते. परंतु दोन दोन महिने पेन्शन मिळायला उशीर होत असल्याने त्यांना अनेक आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. अनेकदा भाडे देता न आल्याने घरमलकाने त्यांना घराबाहेर देखील काढले. गेल्या काही दिवसांपासून त्या नायगाव, वसई परिसरात भाड्याच्या फ्लॅटमध्ये राहत होत्या. Read More….

You might also like

Comments are closed.