भारतीय मराठी चित्रपट महामंडळ

मराठी चित्रपटांना आंतरराष्ट्रीय बाजारपेठ उपलब्ध व्हावी या हेतूने दि.१२ मे ते २१ मे २०२० या कालावधीमध्ये कान्स (फ्रान्स) फिल्म फेस्टिव्हल आयोजित करण्यात आलेल्या चित्रपट महोत्सवात भाग घेण्यासाठी ३ मराठी चित्रपटांची निवड करण्याकरिता दि.१/१/२०१९ ते दि.३१/१२/२०१९ या कालावधीत सेन्सॉर प्रमाणपत्र प्राप्त झालेल्या चित्रपटांच्या निर्मिती संस्थांकडून निवड प्रक्रियेसाठी विहित नमुन्यातील अर्जाद्वारे प्रवेशिका मागविण्यात येत आहेत. विहित नमुन्यातील अर्ज www.filmcitymumbai.org या संकेतस्थळावर उपलब्ध असून विहित नमुन्यातील अर्ज दि.२९/२/२०२० पर्यंत प्रत्यक्ष अथवा इमेलद्वारे सादर करणे आवश्यक आहे. निवड झालेल्या चित्रपटांची यादी जाहीर झाल्यानंतर निर्मिती संस्थांना त्यांच्या चित्रपटांची DCP व KDM स्वखर्चाने महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळास उपलब्ध करून द्यावी लागेल. अधिक माहितीसाठी श्री. मंगेश राऊळ,जनसंपर्क अधिकारी मोबाईल नं.9819638221/022-28497504 अथवा pro@filmicitymumbai.com द्वारे संपर्क साधता येईल.
——————————————————
मेघराज राजेभोसले- अध्यक्ष, पदाधिकारी, संचालक,
अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ

You might also like

Comments are closed.