नेटफ्लिक्सच्या आगामी चित्रपटात प्रियंका चोप्रा आणि राजकुमार राव दिसणार सोबत

🎭 नेटफ्लिक्सचा आगामी चित्रपट ‘द व्हाइट टायगर’मध्ये अभिनेत्री प्रियंका चोप्रा आणि अभिनेता राजकुमार राव पहिल्यांदाच सोबत काम करताना दिसणार आहेत.

📕 लेखक अरविंद अडिगा यांच्या ‘द व्हाइट टायगर’ या पुस्तकावर हा चित्रपट आधारित असणार आहे.

👨🏻‍💼 या चित्रपटाचे दिग्दर्शन इराणी-अमेरिकन दिग्दर्शक रामिन बहरानी करणार आहे.

🎞 सिनेमाची कथा : ‘द व्हाइट टायगर’ ही कांदबरी एका चहा विक्रेत्याचा यशस्वी उद्योगपतीपर्यंतचा प्रवास दाखवते. त्याचबरोबर प्रेम, खून आणि वर्ग संघर्ष इत्यादी गोष्टींवरही भाष्य करते.

🏵 लेखक अरविंद अडिगा यांचे हे पहिलेच पुस्तक होते व यासाठी त्यांना मॅन बुकर पुरस्कार देखील मिळालेला आहे.

You might also like

Comments are closed.